
ध्रुवकिशोर मंन्साराम पाटील यांची बिनविरोध निवड
📍 मीरा–भाईंदर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी झालेल्या निवड प्रक्रियेत अमळनेर तालुक्यातील निंभोरा गावचे सुपुत्र *ध्रुवकिशोर मंन्साराम पाटील* यांची *बिनविरोध निवड* झाली आहे.
या निवडीमुळे निंभोरा गावासह संपूर्ण अमळनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. पाटील यांनी आजवर सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
उपमहापौर पदाच्या माध्यमातून मीरा–भाईंदर शहराच्या विकासासाठी सकारात्मक, लोकाभिमुख व पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
या निवडीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व नागरिक स्तरातून पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
