
अमळनेर क्रीडा संकुलाच्या मैदानावर १० ते ११ दरम्यान संपन्न झाल्या जिल्हा स्तरीय क्रिकेट स्पर्धा
१) महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघा तर्फे जळगाव जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शिक्षकांसाठी “महासंघ क्रिकेट चषक स्पर्धेचे आयोजन
अमळनेर येथील क्रीडा संकुला च्या मैदानावर १० ते ११ जानेवारी दरम्यान करण्यात आले होते”
अंतिम सामन्यात चाळीसगाव संघाला नमवून जळगाव संघाने महासंघ क्रिकेट चषक 2026″ पटकवला, मालिकावीर चाळीसगाव संघाचे अष्टपैलू खेळाडू “मोईज शेख ठरला तर जळगाव संघाचा “रोहीत बोरसे यांनी उत्कृष्ट गोलंदाज” तर अमळनेर ब संघा”चा अंकित पाटील यांनी उत्कृष्ट फलंदाजाचा सन्मान” पटकावला*
जळगाव व चाळीसगाव संघांदरम्यान झालेल्या *अंतिम सामन्यात जळगाव संघा चा रोहित बोरसे यांनी मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार पटकवला
महासंघ चषकात अमळनेर अ, अमळनेर ब
, पारोळा, पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, भुसावळ, यावल, आणि जामनेर-बोदवड अशा दहा संघांनी भाग घेतला
*महासंघ चषका चे उद्घाटन अमळनेरचे आमदार, अनिलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले,विजेत्या संघाला हेमाकांत पाटील, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या हस्ते विजेत्याना संघाला व उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीस वितरण करण्यात आले
स्पर्धेला लोकनियुक्त नगराध्यक्ष मा डॉ श्री परीक्षित बाविस्कर,उपनगराध्यक्ष प्रशांत निकम,बाजार समिती सभापती अशोक पाटील, यांच्यासह महासंघाचे हेमंतकुमार पाटील, शरद पाटील, मनोहर पाटील, नितीन लाड, नाना पाटील या पदाधिकाऱ्यांनी
भेट देत खेळाडूंचा उत्साह वाढवला, शिक्षक महासंघाचे अतुल चौधरी, गणेश लोळते, स्वप्नील पाटील, आशिष चौधरी, महेंद्र रामोशे,
अमळनेर शहरातील खाजगी प्राथमिक शाळा मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधु-भगिनी यांच्या सहकार्याने स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या
दरम्यान महासंघ चषक स्पर्धेचे आयोजन अंत्यत, नियोजनपूर्वक, शिस्तबद्ध व यशस्वी केल्याने अमळनेर तालुका खाजगी प्राथमिक महासंघाचे राज्य पदाधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे
अमळनेर येथे प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात, संघभावना आणि खिलाडूवृत्तीने ओतप्रोत अशा परीस्थितीत मोठ्या दिमाखात संपन्न झाला या निमित्ताने संपूर्ण वातावरण महासंघमय झाल्याचे दिसून आले*
