अडचणीच्या काळात व्यापाऱ्यांनी एकसंघ राहून निर्णय घ्यावा !
व्यापाऱ्यांच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचा सुर!
मोबाईल व्यापाऱ्यांची बैठक उत्साहात संपन्न!
अमळनेर : येथील शिवसेना कार्यालय येथे मोबाईल व्यापारी असोसिएशन ची महत्वाची बैठक मोबाईल असोसिएशन चे अध्यक्ष प्रवीण बी.महाजन यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथम महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी मोबाईल व्यापारातील अडचणी बाबत अनेत व्यापाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले त्यात अमित ललवाणी,राजू साळी,विशाल भावसार(भिमा)दिनेश पाटील,आकाश बठेजा,महेश नागदेव, तोसिफ शेख,विशाल नाथ,दिनू आबा, मोनू चौधरी,प्रेम बीतराई आदींनी आपले मनोगत वेक्त केले.सर्वानुमते घेण्यात आलेल्या व्यापारी हिताच्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी हात उंचावून समर्थन देऊन एकमताने अनेक ठराव मोबाईल असोसिएशन ने मंजूर केले आहेत या निर्णयाचे मोबाईल व्यापाऱ्यांनी स्वागत केलेले आहे.
यावेळी शरद चौधरी,धीरज जैन ,तन्वीर मोमीन,रेहान शेख, अमोल पाटील,निलेश राठोड,संजय भावसार,निलेश कोळी,बिलाल मणियार,पवन बीत्राई,अजय पवार,मनीष पंजवाणी,विष्णू पाटील,काटे बंधू,प्रवीण पाटील,मोहित बीतराई,वसीम शेख,संजय आयलाणी,नदीम खाटीक,सूनील शर्मा,अतुल चौधरी, दीपक लालसाई, सूचित बजाज,शरद पवार,दर्शन लोढा,राकेश बिऱ्हाडे,समाधान माळी, रॉकी पवार,यांच्यासह असंख्य व्यापारी बांधव उपस्थित होते मोबाईल असोशीएशन चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्येक्रमाचे सूत्रसंचालन अमित ललवाणी यांनी तर आभार राजू साळी यांनी मानले

