जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रणाईचे येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
अमळनेर :-
जि. प. प्राथमिक शाळा रणाईचे ता. अमळनेर येथील वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन जानवे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री.शरद जानकीराम सोनवणे व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुभाष धरमदास राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात गणेश वंदना, कालीबिंदी, मेरा रंग दे बसंती चोला, वेंगळ लागे मजेदार, जातेन आतेम बंजारा गीत, कोळीगीत, शिवकन्या इत्यादी गाण्यांवर बहारदार नृत्य व सासु सुनेचे नाटक चिमुकल्यांनी सादर केले. रणाईचे बुद्रुक व रणाईचे खुर्द गावातील रसिक प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद कलाविष्कार कार्यक्रमास मिळाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सतीश ढोले, शत्रुघ्न रोकडे, वैशाली पाटील, प्रतिभा पाटील, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. महेंद्र पाटील सर यांनी केले.यावेळी ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

