विद्यार्थ्यांनी विज्ञान युगात जगताना सुसंस्कारी व्हावे – स. द. भावसार
वसंतनगर आश्रम शाळेत शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन —
अमळनेर :-
एकविसावे शतक हे विज्ञान युग म्हणून ओळखले जाते. या विज्ञान युगात जगताना सद्यस्थितीत संस्कार हरवत चाललो आहोत.म्हणूनच विज्ञान युगात जगताना अंधश्रद्धा न वाढवता सुसंस्कार वाढवण्याची गरज आहे. असे वसंतनगर ता. पारोळा येथील आश्रम शाळेत शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श अधिकारी गौरविलेले गटविकास अधिकारी विलास सनेर होते. तर विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटक राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त शिक्षक सदानंद भावसार होते. संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव, केंद्रप्रमुख करुणा देवकर, गजमल जाधव,प्राचार्य एल. एस. पाटील, मुख्याध्यापक सोपान पाटील, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शनात इयत्ता पहिली ते बाराविच्या विद्यार्थ्यांनी १३८ मॉडेल तयार केले होते. याप्रसंगी श्री.विलास सनेर यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्याकडून विज्ञानाच्या जिज्ञासा निर्माण होतील अशा कृती करून घेतल्या. तर श्री.सुभाष जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,विज्ञानात प्रगती करताना या जगाचा पोशिंदा शेतकरी राजासाठी नव-नवीन तंत्रज्ञान विकसित करा, म्हणजे आमच्या शेतकरी बांधवाना कर्जामुळे आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही.करुणा देवकर यांनीही मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थीनी तयार केलेले मॉडेल पाहण्यासाठी वसंतनगर, पिंपळकोठे, भोलाणे येथील गावातील ग्रामस्थ, पिंपळकोठे, भोलाणे येथील जिल्हा परिषदेचे शिक्षक, विद्यार्थी यांनी भेट देत पाहणी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील आभार पी. एच. निकुंभे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीते साठी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

