प्रकृती आणि प्रवृत्तीचा संदेश देऊन गाजवला महोत्सव.: स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन बनले प्रेरणास्रोत
अमळनेर :
“जिथे शिक्षण फक्त शिकवण्यापुरतं मर्यादित नाही, तर जीवन घडवण्याचं एक साधन बनतं, तिथे प्रत्येक उत्सव प्रेरणेस्रोत ठरतो.”
स्वामी विवेकानंद इंटरनेशनल सीबीएसई स्कूल, अमळनेरमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाने प्रकृती आणि प्रवृत्तीच्या गहन संदेशासह प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श केला.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली, ज्यात मुख्य पाहुणे, जिल्हा कलेक्टर वेवोतोलू केझो, माजी नगराध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या उपस्थित होते.
वेगळे विचार, वेगळी ओळख :-
स्वामी विवेकानंद इंटरनेशनल स्कूल आपल्या अनोख्या विचारसरणी आणि मूल्यांसाठी ओळखले जाते. इथे शिक्षण फक्त पाठ्यक्रमापुरतं मर्यादित नाही, तर मुलांच्या व्यक्तिमत्त्व आणि संस्कारांना आकार देण्यावर भर दिला जातो. याच कारणामुळे या शाळेने प्रत्येक वर्षी समाजासाठी एक संदेश दिला आहे.
प्रकृती आणि प्रवृत्तीचा अद्भुत संगम :- या वर्षाचा विषय, प्रकृती आणि प्रवृत्ती, प्रेक्षकांना गहिर्या विचारांत मग्न करीत होता. विद्यार्थ्यांनी प्रकृतीचे महत्त्व आणि तिचं संरक्षण करण्यासाठी दिलेले संदेश असलेल्या अद्भुत नृत्य, नाटिका आणि सादरीकरणांमुळे प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. रावणाने लक्ष्मणाला दिलेल्या उपदेशावर आधारित नाटिका प्रत्येकाला विचार करण्यास भाग पाडत होती की जीवनातील चागलं आणि वाईटाचे संतुलन कशे राखावे.
सर्व सादरीकरणांनी जिंकली मने:-
प्रत्येक सादरीकरणाने प्रेक्षकांना टाळ्यांच्या गजरात थिरकण्यास प्रवृत्त केले. बालकलाकारांची रंगीबेरंगी सादरीकरणं किंवा प्रकृतीच्या रक्षणासाठी घेतलेली सामूहिक शपथ, प्रत्येक क्षणाने हे सिद्ध केले की हे फक्त एक कार्यक्रम नाही, तर एक प्रेरणादायक यात्रा आहे.
सन्मान आणि गर्वाचा क्षण
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना विविध स्पर्धांमध्ये मिळवलेल्या यशाबद्दल सन्मानित करण्यात आले. हा क्षण ना केवळ गर्वाचा होता, तर तो दर्शवतो की शाळा फक्त शिक्षण नाही, तर मुलांच्या बहुपरिधीच्या गुणांना चालना देत आहे.
पालकांचे अप्रतिम समर्थन:-
कार्यक्रमात पालकांची भागीदारी आणि उत्साह उल्लेखनीय होता. त्यांनी शाळेच्या या प्रयत्नाचे कौतुक करत सांगितले, “अमळनेर मधील अशी एकमेव शाळा आहे जी शिक्षणाला व संस्काराला एक साथ जोडते.”
कार्यक्रमाच्या यशामध्ये शाळेचे मार्गदर्शक बजरंग अग्रवाल, संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल, चेअरमन डी. डी. पाटिल, संचालक ममता अग्रवाल, आचल अग्रवाल यांचे महत्त्वाचे योगदान होते.
शाळेच्या अध्यक्ष सितीका अग्रवाल यांनी सर्व उपस्थित अतिथी, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करत म्हटले, आम्हाला मुलांना फक्त शिकवायचं नाही, तर त्यांना घडवायचं आहे. या प्रवासात तुमचं सहयोग हेच आमचं सामर्थ्य आहे.
कार्यक्रमाच्या यशाचे श्रेय प्राचार्य विनोद अमृतकर व सर्व शिक्षकांच्या कठोर परिश्रमांना जाते.
हे स्नेहसंमेलन केवळ मनोरंजनाचे नाही, तर सामाजिक बदल आणि प्रेरणेचे एक अद्भुत उदाहरण ठरले.

