श्री बी बी ठाकरे हायस्कूल वावडे येथील इयत्ता दहावीचा सन 89 – 90 च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा
अमळनेर :- श्री.बी बी ठाकरे हायस्कूल वावडे येथील इयत्ता दहावीचा सन 89-90 च्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहमेळावा ता. 12 रोजी संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री जी. ए.चौधरी सर तर प्रमुख पाहुणे श्री पी. बी.ठाकरे श्री.डी. बी. साळुंखे सर होते. कृष्ण सुदामा आणि सुभद्रा मित्रपरिवार ग्रुपच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना एकत्र करणाऱ्या सह कार्यक्रमाचे आयोजन करणारे श्री विजय पाटील श्री रामकृष्ण चव्हाण श्री ज्ञानेश्वर रावण पाटील श्री रमेश सुतार सौ.मनीषा पाटील सौ.छाया बोरसे श्री मधुकर ठाकरे श्री प्रभुदास पवार यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गुलाब बोरसे यांनी केले कार्यक्रमाच्या वेळेस सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
सुमारे 35 वर्षानंतर सर्व मित्र-मैत्रिणी एकत्र आल्याने प्रत्येकाने एकमेकांच्या आठवणीत रमले होते.

