महसुलच्या महिला पथकाने पकडला अवैध वाळूचा टेम्पो
अमळनेर :-
येथील महसूल विभागाच्या महिला भरारी पथकाने माळी वाड़ा भागात अवैध वाळू वाहतूक करणारा टेम्पो पकडला.
अवैध रित्या वाळू उपसा करून महसूल बुडवत असल्याने तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाने महसूल विभागाच्या भरवस येथील मंडळ अधिकारी स्वाती गिरासे,अमळनेर ग्राम महसूल अधिकारी आदिती जरे, हेड़ावे ग्राम महसूल अधिकारी रुचिका पाटील, संगीता भोसले,शितल पाटील ग्राम महसूल अधिकारी,श्रीमती भामरे ग्राम महसूल अधिकारी खवशी यांनी शहरातील माळी वाडा फाफोरे रस्त्यावर अवैध रित्या वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई केली. वाळूने भरलेला टेम्पो पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला.या कारवाई चे कौतुक सर्वच स्तरातून होत आहे.

