भालेराव नगरमधील व्हालचा खड्डा देतोय अपघाताला आमंत्रण..
कॉलनीतील तरुणांनी नारळ फोडून केला नगरपालिका प्रशासनाचा निषेध
अमळनेर :-
शहरातील भालेराव नगर मधील मुख्य रस्त्यावर व्हालच्या खड्ड्यावर बसविण्यात आलेली लोखंडी जाळी तुटल्याने नागरिकांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने काल ता. 10 रोजी कॉलनीतील तरुणांनी तुटलेल्या जाळीचा व खड्ड्याची पुजा करीत नारळ फोडून दिवे लावीत नगरपालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करीत याठिकाणी भला मोठ्या दगडावर गुलाल टाकण्यात आला.
या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. मात्र या मुख्य रस्त्यावरील रहादारीत नागरिक, विद्यार्थी यांचा वापर मोठ्याप्रमाणात असून नगरपालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने या कॉलनीतील तरुणांनी या तुटलेल्या जाळीचा व खड्ड्याची पुजा करीत नारळ फोडून दिवे लावीत नगरपालिका प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त करीत याठिकाणी दगडावर गुलाल टाकला आहे.
या रस्त्यावरून दररोज हजारो वाहन वापरतात.या जाळीवरून अवजड वाहन गेल्याने जाळी तुटली आहे. दुचाकीवरून जाणारे नागरिक, विद्यार्थी यांना धोका निर्माण झाला आहे. या खड्ड्याच्या जवळून जाताना वाहनधारकाना भीती व्यक्त केली आहे.
या खड्ड्यात नगरपालिकेने तात्काळ जाळी बसवून सहकार्य करावे अशीही मागणी केली आहे. मात्र ही समस्या इथेच नसून सर्वत्र अशा प्रकारे समस्या निर्माण झाल्याने नगरपालिकेने याबाबत दक्षता घ्यावी.

