शिरुड विकास सोसायटीच्या चेअरमन पदी बापुराव महाजन, व्हॉइस चेअरमन पदी धोंडू पाटील यांची बिनविरोध निवड
अमळनेर :-
तालुक्यातील शिरुड येथे ता. ११ जानेवारी २०२५ रोजी विकास सोसायटीच्या चेअरमन पदी बापुराव भिवसन महाजन तर व्हाईस चेअरमन पदी धोंडू हिंमतराव पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
चेअरमन मीराबाई विश्वास पाटील व्हाईस चेअरमन अनंतराव धनाजी मोरे यांनी ठरल्याप्रमाणे राजीनामा दिल्याने बापूराव महाजन, धोंडू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी निवडणूक अधिकारी म्हणून सुनिल महाजन यांनी काम पाहिले तर सचिव रवींद्र पुंजू पाटील यांनी सहकार्य केले.
यावेळी माजी प्रशासक बाजार समितीच्या तिलोत्तमा पाटील, बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती शाम अहिरे, सरपंच गोविंदा सोनवणे, विकास सोसायटी संचालक सविता पाटील, वासुदेव पाटील, भास्कर पाटील, अरुण पाटील, सीताराम पाटील, गोरख धनगर, सुभाष महाजन, गावातील विरभान पाटील नंदलाल पाटील, वसंत पाटील, अतुल सोनवणे, विनोद सोनावणे, अजय बोरसे, अंकित पाटील, यशवंत बैसाने, आनंदराव पाटील, सागर पाटील, बापू मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला.

