जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळयात कळसरेच्या अनिता सुरडकर सन्मानित
मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांनी केला सन्मानित
अमळनेर :-
ओपन लिंक फाउंडेशन अंतर्गत विनोबा ॲपचा उपयोग करत, ता. 31 डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षक सन्मान सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी जिल्ह्यातील विविध शाळांमधील गुणवत्तापूर्ण कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित कुमार यांच्या हस्ते शिक्षकांना प्रमाणपत्र, विनोबा बॅग, टीएलएम मोबाईल ट्रायपॉड देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री. विकास पाटील, उपशिक्षणाधिकरी श्री. चौधरी, श्री. सरोदे, तसेच ओपन लिंक फाउंडेशनचे कार्यक्रम अधिकारी श्री. राम काळे, प्रकल्प अधिकारी माननीय श्रीमती संदीप सुरेखा मदन साबळे, श्री. सचिन ससाने उपस्थित होते.
सन्मानित शिक्षकांमध्ये
जळगांव जिल्हयाचे प्रथम क्रमांक
श्रीमती अनिता भाऊराव सुरडकर
जिल्हा परिषद शाळा कन्या कळमसरे ता. अमऴनेर,श्री. नितीन पाटील – तालुका पारोळा,श्री. निलेश पाटील – तालुका पाचोरा,श्रीमती. अर्चना महाजन – तालुका चाळीसगाव,
श्रीमती गायत्री देसले – तालुका पारोळा,श्री. विशाल माळी -तालुका भडगाव,कार्यक्रमाच्या प्रारंभी शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रम व विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. ओपन लिंक फाउंडेशनच्या विनोबा ॲपद्वारे शिक्षणात तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग कसा होतो, हे यावेळी दाखवण्यात आले.
इतर शिक्षकांना आव्हान:-
कार्यक्रमाच्या समारोपात, उपस्थित मान्यवरांनी इतर शिक्षकांना आव्हान केले की, विनोबा ॲपचा प्रभावी वापर करत आपल्या शाळेत आणि विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण कार्य करावे. तसेच तालुका स्तरावर व जिल्हा स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कारासाठी आपले नाव घ्यावे. असे काम हे संपूर्ण शैक्षणिक समुदायासाठी प्रेरणादायी ठरेल, असेही यावेळी सांगितले.

