तांदळी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक शंकरराव बोरसे राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित
अमळनेर :-
तांदळी ता. अमळनेर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री. शंकरराव बोरसे यांना जळगाव येथे राज्यस्तरीय राष्ट्रपिता महात्मा गांधी शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जळगाव जिल्ह्यातील आदिलशहा फारुकी संस्थेच्या वतीने ता. २९ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवन येथे हा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्सहात पार पडला. यावेळी राज्यभरातील विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला गेला.
मुख्याध्यापक श्री. बोरसे सरांनी शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच त्यांना ह्या पुरस्कारांनी सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी श्री बोरसे सर सह परिवार पुरस्कार स्विकारण्यासाठी जळगाव येथे उपस्थित होते. त्यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याने गट शिक्षणाधिकारी रावसाहेब मांगो पाटील, केंद्रप्रमुख अशोक चुडामण सोनवणे, उपशिक्षक सुधीर चौधरी, युवा प्रशिक्षणार्थी कुणाल भरत पाटील, अमळनेर येथील दादासाहेब जी. एम. सोनार नगर येथील दुनियादारी ग्रुपच्या सदस्यांनी, नगावं येथील ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.

