राज्यस्तरीय संघटनेच्या नाशिक विभागीय अध्यक्ष पदी सोमचंद संदानशिव
अमळनेर :-
महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत, संवर्ग अधिकारी संघटनेचा मेळावा संघटनेचे संस्थापक मार्गदर्शक के. के. आंधळे व राज्याध्यक्ष डी. पी. शिंदे यांच्या उपस्थितीत अमळनेर नगरपरिषद येथे पार पडला.
यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी महिला व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते.याप्रसंगी श्री. आंधळे व डी. पी. शिंदे यांनी कर्मचाऱ्यांना मोलाचं मार्गदर्शन करून अमळनेर नगरपरिषद हद्दीसाठी नूतन कार्यकारिणीच्या फलकाचे अनावरण केले.अमळनेर साठी प्रसाद शर्मा यांची अध्यक्ष पदी तर ईश्वरलाल पाटील यांची उपाध्यक्ष पदी नेमणूक करून नाशिक विभागासाठी अध्यक्ष पदी सोमचंद संदानशिव तर तर चोपडा पालिकेतील आरोग्य निरीक्षक श्रीमती दिपाली साळुंके यांची उपाध्यक्षपदी, अमळनेर चे आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे यांची सचिव पदी आणि अंमळनेरचे आरोग्य निरीक्षक किरण कंडारे यांची नेमणूक केली.
चोपडा अध्यक्ष पदी महेश जोशी यांची नियुक्ती केली असून या वेळी कार्यकारिणी सदस्य पदी, नितीन बिऱ्हाडे, जया सरदार, चोपड्याचे श्री. भोंगे यांची निवड झाली.सूत्रसंचालन निवृत्त प्रशासन अधिकारी संजय चौधरी यांनी तर प्रास्ताविक सोमचंद संदानशिव यांनी केले या वेळी उपस्थित मान्यवरांचे अखिल महाराष्ट्र चतुर्थ श्रेणी कर्मचारी व सफाईगार संघटनेचे अध्यक्ष अनिल बेंडवाल यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचा सत्कार केला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद तर्फे मा. नगरसेवक नरेंद्र संदानशिव यांनी संविधानाची प्रतिमा देऊन सत्कार केला तसेच अखिल महाराष्ट्र सफाई मजदूर कांग्रेस चे विकास जाधव व पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.आभार प्रदर्शन संतोष बिऱ्हाडे यांनी केले.

