क्रांतीज्योती महिला ग्रुप अमळनेर आयोजित विविध स्पर्धांना सुरुवात
तीन दिवसीय स्पर्धामध्ये महिलांसाठी स्तुत्य उपक्रम :-
अमळनेर :-
क्रांतीज्योती महिला ग्रुप अमळनेर आयोजित विविध स्पर्धांना आज ता. २५ पासून सुरुवात झाली. याप्रसंगी ऍड.तिलोतमा पाटील यांनी फीत कापून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्रा.डॉ. पी.जे.जोशी सर, सौ.अस्मिता चंद्रात्रे मॅडम, सौ. मिनल महेंद्र महाजन,प्रा. मंदाकिनी भामरे, सौ.किरण पाटील, दिनेश पालवे सर यांची प्रमुख उपस्थित होती.
यात आज रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, चारोळी, लिंबू चमचा,निबंध स्पर्धा आदी स्पर्धाचे आयोजन अमळनेर येथील जुना टाऊन हॉल येथे करण्यात आले आहे. यात महिला व विध्यार्थिनी यांना सहभाग घेता आला. उद्या ता. २६ रोजी दुपारी १ ते ४ या वेळेत वकृत्व,गीत गायन, उखाणे,एकपात्री, कार्यक्रम, स्पर्धा घेण्यात येणार आहेत.
सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी क्रांतीज्योती ग्रुपची स्थापना करण्यात आली आहे. आज विविध स्पर्धांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पुढील वाटचालीची सुरुवात केली.
सौ नीलिमा सोनकुसरे, सौ हेमलता भामरे,सौ. योगिता गुजर, रूपाली जोशी,ज्ञानेश्वरी भामरे, दिपाली वैष्णव यांनी या ग्रुपची स्थापना केली आहे.तसेच अर्चना देशपांडे दिशा संदानशिव,स्वाती पोळ भारती कार्लेकर आणि काळकर मॅडम या ग्रुपच्या सह कार्यकारणी सदस्य आहेत. ता. २७ रोजी कार्यक्रमाचा शेवट होणार असून बक्षीस वितरण केले जाणार आहे.

