सावधान प्रशासन अपघाताची वाट पाहतोय…
अमळनेर शहरात मुख्य मार्गांवर भूमिगत गटारीच्या जाळ्यांची अवस्था खराब
अमळनेर :-
येथील महाराणा प्रताप चौक ते चोपडा नाका दरम्यान रस्त्यावर यात महाराणा प्रताप चौकात व दगडी दरवाज्या जवळ व विविध ठिकाणी भूमिगत गटारीवर लावलेल्या जाळ्यांची अवस्था बिकट झाली आहे.अमळनेर शहरात येणारी सर्व वाहतूक येथूनच होत असते. त्या जाळ्यांना असलेले लोखंडी जाळी तुटल्याने दररोज दोन ते तीन नागरिकांचा अपघात होत आहे. यामुळे सावधान प्रशासन अपघाताची वाट पाहतेय असे फलक या दुर्घटना होईल या जागेवर लावण्याची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करावी तर तिथे कुणीही फोन उचलत नाही. फोन उचलला तरी ते काम आमचे नाही असे उत्तरे दिले जातात.अमळनेर शहरात मुख्य मार्गावर तुटलेल्या जाळ्या आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराने मोठा अपघात होऊ शकतो. बांधकाम विभाग व नगरपालिका यांनी लक्ष घालावे असे नागरिक बोलत आहेत. हीच परिस्थिती भुयारी गटारी मुळे शहरात झाल्याने नागरिकांनी प्रशासनाची उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली आहे.

