नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याज दर आकारू नये
काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे नगर पालिकेला दिले निवेदन
अमळनेर :-
नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याज दर आकारू नये, अशी मागणी काँग्रेस व महाविकास आघाडीतर्फे करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी यांच्यावतीने चक्कर निरीक्षक चंद्रकिरण शिवदे, आरोग्य निरीक्षक किरण खंडारे आणि स्थापना प्रमुख लौकिक समशेर यांनी नगरपालिकेच्या वतीने निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर नगर परिषदेला नियमित पाणीपट्टी भरणाऱ्यांना शेकडा दोन टक्के व्याज दर महिन्याला आकारण्यात येत असून ते आकारू नये याबाबत डॉ. अनिल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिले. माजी नगरसेवक मुन्ना शर्मा, किसान काँग्रेसचे अध्यक्ष प्रा. सुभाष पाटील , अल्पसंख्यांक जिल्हाप्रमुख ॲड. रज्जाक शेख, संदीप घोरपडे, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष तहसील तेली, माजी युवक काँग्रेस अध्यक्ष मनोहर पाटील, अध्यक्ष किसान राष्ट्रवादी तुतारी श्री.लांडगे, गणेश गुप्ता, नगरपरिषद कर निरीक्षक सुखदेव होलार, माजी नगरपरिषद ऑडिटर छोटू वैद्य उपस्थित होते.

