टाकरखेडे येथील मातोश्री इंदूताई
अँग्रो फार्मरला राज्यस्तरीय पुरस्कार –
अमळनेर :-
ता.30 नोव्हेंबर रोजी, जळगाव येथे अँग्रोवर्ल्ड कृषि प्रदर्शनात टाकरखेडा येथिल ” मातोश्री इंदू ताई अँग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.” यांना, “अँग्रोवर्ल्ड आदर्श फार्मर प्रोड्युसर कंपनी ” या , राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
कृषि क्षेत्रात उल्लेखनीय व्यवस्थापन करीत असल्याने श्री. कुर्बान तडवी जिल्हा कृषी अधीक्षक जळगाव ,शैलेंद्र चव्हाण ईडीटर अँग्रोवर्ल्ड, आदि मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
श्री.भटू पाटील व सर्व संचालक व
राष्ट्रीय कृषि व ग्रामीण विकास संस्था नाबार्ड यांनी, राजमाता जिजाऊ महिला मंडळ अमळनेर यांच्या मार्फत कंपनी स्थापना केलेली आहे.

