अमळनेर येथे बालविवाह मुक्त भारत अभियानावर पथनाट्य
अमळनेर :-
बाल विवाह मुक्त भारत अभियान सर्व भारतात ता.27 नोव्हेंबर रोजी सुरवात करण्यात आली.सर्व जिल्ह्यात या मोहिमेचे जोरात स्वागत करण्यात आले.त्यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सर्वांना बाल विवाह प्रतिबंध करणे याविषयी आवाहन केले. सर्व शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी बाल विवाह मुक्त भारत शपथ घेण्यात आली.
भारत सरकारला ऍक्सेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन्स ने समर्थन दिले असून जळगाव जिल्ह्यात आधार संस्था भागीदार आहे.
अमळनेर तालुक्यात प्रांताधिकारी नितीन मुंडावरे यांनी बाल विवाह मुक्त भारत शपथ दिली.त्यावेळी तहसीलदार रुपेशकुमार सुराणा सामाजिक कार्यकर्ते,नागरिक व पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा.विजयकुमार वाघमारे व विद्यार्थी यांनी आधार बहुउद्देशीय संस्था अमळनेर यांच्या माध्यमातून रा.से.यो स्वयंसेवक सागर कोळी, अन्वर, कीर्ती, अनुजा, रत्ना, मयुरी या विद्यार्थ्यांनी पथनाट्य,केंडल मार्च, जनजागृती रॅली असे विविध उपक्रम राबविले जात आहेत यावेळी संस्थेचे डॉ.भारती पाटील,रेणू प्रसाद,योगिता चौधरी मॅडम दीपक संदानशिव,अश्विनी भदाणे, दीप्ती गायकवाड, ज्ञानेश्वरी पाटील,सुष्मा वाघ,भावना सूर्यवंशी,मोहिनी धनगर,योगिता पाटील, ऊर्जिता शिसोदे,यास्मिन, शेख,राकेश महाजन,मुरलीधर बिरारी,दीपक विश्वेश्वर,आनंद पगारे, संदेश, तोशिफ शेख, संदानशिव विकी शिरसाठ,आदींनी परीश्रम घेतले.

