हा मतदार संघातील जनतेचा, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय -अनिल पाटील
अमळनेरला महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांचा दणदणीत विजय
अमळनेर:-
अमळनेर विधानसभा मतदार संघात निवडणूक अत्यंत चुरशीची झाली.महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांनी प्रचंड मतांनी विजय मिळवला. अनिल पाटील यांना 32,667 मतांनी अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांचा दुसऱ्यांदा पराभव केला.तर महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
मंत्री अनिल पाटील यांच्याकडे प्रचारात नियोजन व संघटन होते. पाच वर्ष विकासकामे आणि त्यांचे कार्यकर्ते सक्रीय असल्याने आजचा हा विजय निश्चित होता.
शरदचंद्र पवार यांनी मंत्री अनिल पाटील पुन्हा निवडून येणार नाहीत याची काळजी घेऊ असे सांगितले होते. मात्र ते विधान मंत्री अनिल पाटील यांनी खोडून काढीत आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध केले.
अमळनेरच्या निवडणुकीत आघाडी मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.
डॉ. अनिल शिंदे यांना अपेक्षित मतदान मिळवण्यात अपयश आले असल्याने अनिल पाटील यांना फायदा झाला.अमळनेर विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे उमेदवार अनिल पाटील यांनी एकूण 1,09,182 मतं मिळवली, तर शिरीष चौधरी यांच्यासाठी एकूण 76,515 मत प्राप्त झाली. निवडणुकीत यश मिळाल्यावर अनिल पाटील यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आणि फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली.
मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासनाने सर्व कार्यवाही व्यवस्थित आणि शांततेने पार पाडली.
अनिल पाटील पहिल्या फेरीपासून आघाडीवर :-
आमदार पाटील यांना दुसऱ्यांदा इतिहास घडवण्यास सक्षम ठरला आहे.पहिल्या फेरीपासून ते शेवटच्या फेरीपर्यंत आघाडीवर होते.
निवडणूक कामे उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार सुराणा, महसूल अधिकारी कर्मचारी पोलीस निरीक्षक विकास देवरे व पोलीस बांधव भगिनी यांनी शांततापूर्ण मार्गाने निवडणूक मतमोजणी प्रक्रिया पार पाडली.
अनिल पाटील यांच्या विजयाचा जल्लोष नंतर त्यांनी मतदार संघातील जनतेचे आभार मानीत म्हणाले की, हा माझा विजय नसून मतदार संघातील सर्व सामान्य माणसाचा विजय आहे. मी माझ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आणि शेतकरी बांधव यांच्या दूरदृष्टीने मला निवडून दिले. मी त्यांच्या या उपकाराची परत फेड विकास कामातून करणार आहे. मला ज्यांनी -ज्यांनी कठीण वेळेत मदत केली त्यांची साथ मी सोडणार नाही. तर विरोधक पराभूत उमेदवार शिरीष चौधरी यांचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला.
महायुतीचे उमेदवार अनिल पाटील म्हणाले की हा विजय हा महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचा आहे.. पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली. माझ्या विकास कामावर तालुक्यातील जनतेने विश्वास टाकला.. मला एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून दिले.. त्यामुळे मी अमळनेर करांच्या ऋणात राहू इच्छितो..
सर्व महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते,नातेवाईक, मित्रपरिवार
यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
उमेदवार निहाय मते :-
अमळनेर विधानसभा मतदार संघ उमेदवारांना मिळालेली मते:-
1) डॉ.अनिल नत्थु शिंदे (काँग्रेस)- 13798
*2) अनिल भाईदास पाटील ( राष्ट्रवादी काँग्रेस अ प गट) – 109445 ( विजयी )*
3) सचिन अशोक बाविस्कर (बसपा) – 718
4) अनिल भाईदास पाटील ( अपक्ष) – 522
5) अमोल रमेश पाटील ( अपक्ष ) – 145
6) छबिलाल लालचंद भिल ( अपक्ष ) – 116
7) निंबा धुडकू पाटील ( अपक्ष ) – 174
8) प्रा.प्रतिभा रविंद्र पाटील ( अपक्ष ) – 327
9) यशवंत उदयसिंग मालचे ( अपक्ष ) – 158
10) रतन भानू भिल ( अपक्ष )- 812
11) शिरीष हिरालाल चौधरी (अपक्ष) – 76010
12) शिवाजी दौलत पाटील ( अपक्ष) – 1013
13) नोटा – 1329

