मंत्री अनिलदादा पाटील यांची जल्लोषाची जय्यत तयारी!
अमळनेर :-
मंत्री अनिलदादा पाटील यांची निकालानंतर जल्लोषाची जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी सुरु केली असून त्यांच्या विजयाचे फलक अमळनेर शहरात झळकु लागले आहेत. यावेळी विधानसभा निवडणूक मोठ्या चूरशीची झाली आहे.मंत्री अनिल पाटील यांनी मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास कामे केल्याने मतदार व लाडक्या बहिणींनी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडणूक आणतील असाच सुर सर्वत्र असल्याने विजय उत्सव साजरा करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. यासाठी मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानाजवळ सुमारे पाच हजार कार्यकर्ते बसू शकतील एव्हढा मोठा सभामंडप उभारण्यात आला आहे.
यावेळी कार्यकर्त्यांना नास्ता, पाणीची सोयही करण्यात आली असून मंत्री अनिल पाटील सुमारे वीस हजार मताने निवडून येतील असे राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष भागवत पाटील, माजी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महेंद्र बोरसे यांनी सांगितले.

