बहादरपुर येथील बद्रीनारायणाच्या रथोत्सवात डॉ. अनिल शिंदे झाले सहभागी
अमळनेर:- पारोळा तालुक्यातील बहादरपुर येथील बद्रीनारायणाच्या रथोत्सवात महाविकास आघाडीचे डॉ. अनिल शिंदे यांनी सहभागी होत भगवान बद्रीनारायणाचे आशीर्वाद घेतले.
तालुक्यातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचारात सर्व नेते व कार्यकर्त्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला आहे. तालुक्यात परिवर्तनाची लाट असल्याचे चित्र असून डॉ. अनिल शिंदे यांना सर्व सामान्य मतदारांनी पाठींबा देत यावेळी डॉ. शिंदेना विजयी करा असा नाराच सर्वत्र सुरु आहे.
काल ता.१४ रोजी बहादरपुर येथील बद्रीनारायणाच्या रथोत्सवात डॉ. अनिल शिंदे, तसेच महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी रथोत्सवात रथ ओढण्याचा मान डॉ. शिंदे यांना मिळाला. अंगी मग्रुरी नसलेला साधा माणूस म्हणून मतदारसंघातून डॉ. शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता परिवर्तनाच्या लाटेत सहभागी झालेली तालुक्यातील जनताच डॉ. शिंदेच्या विजयाचा रथ खेचणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे.

