बहाद्दरपूर येथील यात्रोत्सवात रा. का. मिश्र शाळेचे लेझिम पथकाचा सहभाग
पारोळा :-
खानदेशातील नामवंत यात्रांपैकी बहादरपूर तालुका पारोळा बद्रीनाथ भगवानची यात्रा दरवर्षी कार्तिक महिन्यात असते त्रयोदशीला वहन चतुर्दशीला रथोत्सव व कार्तिकी पौर्णिमेला पालखी सोहळा,दुपारून कुस्त्यांची भव्य दंगल असते.या यात्रेत बाहेरगावी नोकरीनिमित्त गेलेले सर्व नोकरदार सासरी गेलेल्या मुली यात्रेच्या काळात आवर्जून उपस्थित राहतात. या यात्रेत बद्रीनाथ संस्थानचे अध्यक्ष श्री नारायण मिश्रा, उपाध्यक्ष श्री गुलाबराव पाटील व सर्व कार्यकारणी मंडळ यात्रा पार पाडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करते या यात्रेत नूतन शिक्षण संस्था बहाद्दरपूर तालुका पारोळा येथील रा का मिश्र विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय यांचे ढोल पथक झांज पथक व लेझीम पथक यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले यात्रेच्या तिन्ही दिवस साधारणता 120 मुलांची ही पथक आणि वाजंत्री यात्रेचे मुख्य आकर्षण ठरले या पथकास मंत्री अनिल भाईदास पाटील माजी आमदार शिरीष दादा चौधरी महाळपूरचे सरपंच सुधाकर पाटील माजी सरपंच सुभाष पाटील शिरसोदे सरपंच रमेश सैंदाणे बहादरपूर सरपंच भिकन पारधी उपसरपंच परेश चौधरी सुनील वाणी यांनी पथकात भेट दिली पथकातील विद्यार्थ्यांचे संबंधित शिक्षकांचे व नूतन शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणीचे कौतुक केले त्यासाठी नूतन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेशचंद्र वैद्य उपाध्यक्ष गंगाराम महाजन व्यवस्थापक डॉक्टर अशोक पाटील कोषाध्यक्ष भगवान चौधरी सचिव सुनील मोरे व नूतन
शिक्षण संस्थेची कार्यकारणी शाळेचे प्राचार्य संजय चौधरी व सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.
या यात्रेत ढोल पथकासाठी प्राध्यापक बी व्ही सोनार सर कुलकर्णी सर सूर्यवंशी मॅडम, ठाकरे मॅडम,यांचे सहकार्य लाभले झांज लेझीम पथकासाठी श्री आर यू कोळी श्री ठाकरे सर यांनी सहकार्य केले.

