अमळनेर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत , चूरस वाढली
आरोप, प्रत्यारोपाच्या फेऱ्या
अमळनेर :-
अमळनेर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत असल्याने या निडणुकीला चांगलाच रंग भरला आहे. मतदार संघात सर्वत्र निडणुकीचे वातावरण तापले असून प्रचारात आरोप, प्रत्यारोपाच्या फेऱ्या चांगल्याच झाडल्या जात आहेत.
यावेळी एकूण बारा उमेदवार रिंगणात असून तीन उमेदवार अमळनेर मतदार संघात बलाढ्य असल्याचे चित्र समोर आहे.
महायुतीचे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार तथा मंत्री अनिल भाईदास पाटील, महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे डॉ. अनिल नत्थू शिंदे व मागील पंचवार्षिक निवडणुकीत यावेळी अपक्ष उमेदवारी करणारे शिरीष हिरालाल चौधरी हे तीनही उमेदवार यावेळी रिंगणात असून मतदार संघात यांच्या प्रचाराने निवडणुकीत चूरस निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
अमळनेर शहरासह ग्रामीण भागात प्रचार करताना विद्यमान मंत्री यांनी केलेल्या कोट्यावधी रुपयांचा विकासकामांचा लेखाजोखा मांडत त्यांनी तालुक्याला अजून विकासाची जोड लावायची असेल तर महायुतीचे सरकार आणा म्हणीत तालुक्यात आपली माती आपली माणसं हे अनिल पाटील यांचे फ्रॅक्टर सुरु आहे. तर महाविकास आघाडीचे उमेदवार काँग्रेस पक्षाचे डॉ. अनिल शिंदे यांनी राज्यात भ्रष्ट महायुतीने सर्व सामान्य माणसाला न परवडणारे शेतकऱ्यांना महागाईचा सामना करून हमीभाव न देता कर्जाच्या खायीत नेणारेच्या महाविकास आघाडीकडून उमेदवारी करीत जोरदार प्रचार सुरु आहे.
तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी करीत विद्यमान आमदार व मंत्री यांना शह देण्यासाठी त्यांनीही दंड थोपटलेले आहे.
या निवडणूकीच्या प्रचारात आजी -माजी आमदार व कार्यकर्ते एकमेकांवर आरोप करीत प्रचरात चूरस वाढली आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनीही तालुक्यात वैद्यकीय क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असल्याने त्यांनाही चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. डॉ. अनिल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जात समस्या समजून घेणे, शासनाकडे पाठपुरावा करणे याबाबत त्यांचेही काम प्रभावी असल्याने डॉ. अनिल शिंदे यांचाही प्रचार जोरदार सुरु आहे. तर माजी आमदार शिरीष चौधरी यांनाही मतदार संघाचा अभ्यास असल्याने त्यांनीही निवडणुक चूरशीची केली आहे. मात्र मागील पंच वार्षिक काळात पराभव झाल्यानंतर ते संपर्कात न राहिल्याने नाराजीही दिसून येत आहे. मात्र तीनही मातब्बर उमेदवारांमध्ये कोण बाजी मारेल यासाठी मतदारांसह राज्यातील दिग्गज पुढाऱ्यांचे लक्ष अमळनेर विधान सभा मतदार संघाकडे लागून आहे.

