दोस्ती दुनियादारीतले युवा नेतृत्व महेंद्र बोरसे
काही लोक जन्मताच चांदीच्या ताटात अन् सोन्याच्या चमच्याने जेवण करतांना दिसुन आले तरी उभ्या आयुष्यात असे जगतात की, त्यांना त्यांचे आयुष्य कसे जगले हे आयुष्याच्या शेवटच्या वळणावरही कळत नाही. मात्र त्याला अपवाद सात्री ता.अमळनेर येथील उमदे व्यक्तिमत्व अण्णासो.महेंद्र बोरसे यांचा आज ता. ७ रोजी वाढदिवस (अभिष्टचिंतन) त्यानिमित्त घेतलेला त्यांचा वागणुकीचा आढावा………………
सात्री गावात एका शेतकरी व मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले बहुआयामी व्यक्तिमत्व महेंद्र अण्णा यांनी महाविद्यालयीन जीवनातच सामाजिक ,राजकीय जीवनाचे धडे घेतल्याने महाविद्यालयीन शिक्षणानंतर नोकरीकडे न वळता त्यांनी सामाजिक ,राजकीय आखाडयात प्रवेश केल्यानंतर अल्पावधितच त्यांनी आपल्या कामाची चुणुक दाखविल्यामुळे गाव,पंचक्रोशी,तालुकासह जिल्ह्यात तरुणाईत आगळी, वेगळी ओळख निर्माण केल्याने त्यांनी कमी वयात खुप पदे भोगुन त्या पदाना न्यायही दिला. कमी वयातच सलग *चार* पंचवार्षिक गावात ग्रामपंचायतीवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. विधानसभा क्षेत्र प्रमुख ,तालुकाध्यक्ष,वाचनालय व ग्रंथालय प्रदेश अध्यक्ष ,दक्षता समीती सदस्य,रेशन संघटना तालुकाध्यक्ष,निर्मलाई फौंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ,सात्री गावाचे पुनर्वसन समिती अध्यक्ष आदी पदे त्यांनी आपल्या *पस्तीसीत(३५)* मिळवून जन-मानसात आजही त्यांच्या स्वभावात या पदांचा लवलेश जाणवत नाही. नाहीतर एखादा ग्रामपंचायतीचा सदस्य, विकास सोसायटी संचालक निवडून आला तरी दारावर पाटी लावल्याशिवाय राहत नाही.
गाव पुनर्वसित असल्याने गावात कुठलीही जनसुविधा उपलब्ध होत नसल्याने वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा करून सर्वसामान्य ग्रामस्थाना दिवस रात्र संकटात साथ देताना मदत करतांना *सेवा परमो धर्म* ही ब्रीद वाक्यच आई वडिलांच्या संस्कारांमुळे अंगवळणी पडले आहे.तर संसाराच्या रथाच्या चाकातील दूसरे चाक म्हणजे पत्नी त्यांच्या सौभाग्यवती यांची भक्कम साथ असल्याने हा ध्येय्यवेडा तरुण अपनी धुन मे बस चलता जा रहा है हे मात्र नक्की………………….
त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्त हेच सांगेन——
*उगता हुआ सूरज दुआ दे आपको, खिलता हुआ फूल खुशबु दे आपको, मैं तो कुछ दे नहीं सकता, देने वाला लंबी उम्र दे आपको ! जन्मदिन हार्दिक शुभकामनाएं*
*ख्वाहिशों के समंदर के सब मोती तेरे नसीब हो; तेरे चाहने वाले हमसफ़र तेरे हरदम करीब हों, कुछ यूँ उतरे तेरे लिए रहमतों का मौसम, कि तेरी हर दुआ, हर ख्वाहिश कबूल हो। जन्मदिन की बधाई*
शुभेच्छुक—–
*प्रा.हिरालाल पाटील*
