अमळनेरात महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा
काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात लावणार हजेरी
अमळनेर : अमळनेर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा ७ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
राज्याचे नेते काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात यांची यावेळी उपस्थिती लाभणार असून गुरुवार ७ रोजी सकाळी १० वाजता शहरातील मराठा मंगल कार्यालयात बाळासाहेब थोरात यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थिती लावावी, असे आवाहन महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी केले आहे.

