येथे रंगणार माहेरवाशीणींचा सोहळा “वाट माहेरची”
अमळनेर –
मारवड ता. अमळनेर येथे ता.4 नोव्हेंबर रोजी येथील सु.हि.मुंदडे हायस्कूल मारवड येथे 20 वर्षांपासून ते चक्क 90 वर्षे वयापर्यंत च्या सर्व विवाहीत माहेरवाशीणींचा स्नेहमीलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला “वाट माहेरची” या अंतर्गत हा सोहळा साजरा होणार आहे.त्यात इतर गावांहून मारवड येथे शिक्षणासाठी येणाऱ्या सर्व माहेरवाशीण भगिनींचा समावेश असणार आहे.

ता. 4 रोजी सकाळी 8 वाजता संपूर्ण गावात विविध कर्तृत्ववान महिलांच्या वेशभूषेत सर्व भगिनींची रॅली निघेल,त्यांनतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचे कार्यक्रम होतील,महिलांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम आहेत.ह्यात बालपणी च्या आठवणींना उजाळा देऊन पुन्हा एकदा लहान होण्याचा अनुभव घेता येणार आहे. तालुक्यात प्रथमच होणाऱ्या या आगळ्या- वेगळ्या कार्यक्रमाची उत्सुकता माहेरवाशीन यांना लागला आहे.
ह्या कार्यक्रमाच्या यशस्वीत्यासाठी मुक्ताई, ज्ञानदेव ग्रुप,मारवड विशेष मेहनत घेत आहेत.

