अमळनेरात आज सम्राट बळीराजा महोत्सव साजरा होणार
अमळनेर:- दरवर्षी साजरा होणारा बळीराजा महोत्सव यावर्षीही येथील जय अंबे व तरुण कुढापा मित्र परिवार,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड,संभाजी ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने ता.२ नोव्हेंबर रोजी सम्राट बळीराजा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शहरातील सप्तशृंगी कॉलनी,शिव कॉलनी भागातून भागातून सकाळी ९.३० वाजता बळीराजा यांच्या मिरवणुकीला सुरवात होणार असून शहरातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक जाणार आहे.मिरवणुकीचा समारोप तहसील कार्यालयाजवळील बळीराजा स्मारक येथे होणार आहे. यावेळी खासदार स्मिता वाघ यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ पूजन तर साहेबराव पाटील यांच्या हस्ते बळीराजा पूजन होणार आहे. यावेळी बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील,माजी जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो या संकल्पाने प्रेरित होत आयोजकांकडून दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

