महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांनी बद्रीनाथाचे दर्शन घेत केली प्रचाराला सुरुवात
अमळनेर :- अमळनेर विधानसभा मतदारसंघातील पारोळा तालुक्यातील बहादरपूर, शिरसोदे, महाळपूर, शेवगे, पुनगाव, बोदर्डे या गावी आज महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अनिल नथ्थु शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत प्रचार केला. डॉ. अनिल शिंदे यांनी सर्वप्रथम बहादरपूर येथील श्री बद्रीनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेत प्रचाराचा शुभारंभ केला. डॉ. अनिल शिंदे यांनी या प्रचार रॅलीत मतदार यांच्याशी संवाद साधीत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यावर सर्वसामान्य शेतकरी, गरीब जनता, बेरोजगारी, सिंचन आदी समस्याबाबत त्यांनी चर्चा करीत या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असेही सांगितले.यावेळी माजी आमदार डॉ. बी. एस पाटील,अँड ललिता पाटील,तिलोत्तमा पाटील, उमेश पाटील, इंधवे येथील सरपंच जितेंद्र पाटील, डॉ.प्रवीण पाटील,प्रा. सुभाष पाटील, सुरेश पिरण पाटील,रिता बाविस्कर,धनगर पाटील,विजू मास्तर,महेश पाटील, जुबेर पठान , अज़हर सय्यद,गिरीश पाटील, दिनेश पवार, आशिष शिंदे, चंद्रशेखर भावसार, पराग पाटील , नीळकंठ तात्या पाटील, प्रताप आबा पाटील,प्रा श्याम पवार, अरुण शिंदे सर,डॉ दिपालीताई शिंदे, डॉ मयुरीताई जोशी, उदय यशवंत पाटील, डॉ सिद्धार्थ पाटील,बाळासाहेब पाटील , मयूर पाटील कविता पवार,रोहन मोरेसह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व सर्व ज्येष्ठ नेते युवा मंडळी देखील उपस्थित होते. यावेळी डॉ. अनिल शिंदे यांना प्रचारात महाविकास आघाडीसोबत आम्ही असल्याचे मतदारांनी सांगितले.

