दुचाकीस्वारला बसची धडक, जागीच ठार
अमळनेर —
भरधाव वेगाने येणाऱ्या बसने दुचाकीला मागाहून धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना काल ता. 30 रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास देवगाव देवळी ता. अमळनेर येथील गावाजवळ घडली.
खाचणे ता. चोपडा येथील भानुदास पुंडलिक पाटील (वय -64) हे खाचणे येथून त्यांच्या खाजगी कामानिमित्त दुचाकीने अमळनेर कडे दुचाकी क्र.एम. एच. 19 ए. जे. 4397 ने जात असताना देवळी फाट्याजवळ चोपडाकडून येणारी चोपडा बदलापूर एस टी बस क्र. एम. एच. 20 बी एल – 2538 या बस वरील चालकाने दुचाकीला मागून धडक दिली.
भानुदास पाटील यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मयत भानुदास पाटील यांचे चुलत भाऊ यांच्या फिर्यादीवरून बस चालक शेख मिनाजोद्दीन जहीरोद्दीन रा. अडावद ता. चोपडा यांच्याविरोधात अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कोंस्टेबल सुनील पाटील हे करीत आहेत.

