महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बसविण्यासाठी अमळनेरात महायुतीचे नामदार अनिल पाटील निवडून आणा-खा.स्मिताताई वाघ
विस्तृत बैठकीत सर्व भाजप कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन
अमळनेर-महाराष्ट्रात महायुतीचे सरकार बसविण्यासाठी अमळनेर मतदारसंघात महायुतीचा आमदार निवडणे आवश्यक आहे.संपुर्ण अमळनेर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे असे आवाहन खासदार स्मिताताई वाघ यांनी भाजपाच्या बैठकीत केले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बन्सीलाल पॅलेस येथे भाजपा शहर व ग्रामीणची विस्तृत बैठक आयोजित करण्यात आली होती.सुरवातीला पक्ष निरीक्षक मुकेशभाई लाँगडीया यांनी मार्गदर्शन केले.यावेळी बोलताना खासदार स्मिताताई पुढे म्हणाल्या की भाजप तथा महायुती शासनाने शेतकरी बांधव असतील, महिला असतील,युवक असतील अश्या अनेक घटकांना न्याय देण्याचाच प्रयत्न केला असून विकासाभिमुख असे हे सरकार ठरले आहे.लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना स्वावलंबी बनविण्याचे मोठे कार्य या सरकारने केले आहे.आपल्या सरकारने केलेली कामे जनते पर्यंत पोहोचविण्याचे काम आता आपले आहे.या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांच्या नेतृत्वाखाली कोणत्याही परिस्थितीत पुन्हा महायुती शासन महाराष्ट्र राज्यात विराजमान व्हावे ही सर्वांची इच्छा आहे.अमळनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार नामदार अनिल पाटील यांच्या पाठीशीच आपल्याला ताकद उभी करायची आहे.मी खासदार असली तरी माझ्या सोबतीला महायुतीचा आमदार असल्यास पाडळसरे धरणासारखे विकासाचे मोठे प्रश्न नक्कीच सुटणार आहे.यासाठी सर्वांनी असतील नसतील ते मतभेद विसरून कामाला लागावे,आणि जास्तीत जास्त मतदान महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात टाकावे असे आवाहन त्यानी कार्यकर्त्यांना केले.

