जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या सात जागा -प्रतिभा शिंदे
अमळनेर :-महाराष्ट्र राज्यात लोकशाही चे दुसरे पर्व सुरू झाले आहे,लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला भरभरून साथ मिळाली,किमान सात जागा आमच्या जळगाव जिल्ह्यात येतील,अमळनेर मतदारसंघात आमचे सर्व साथी प्रचाराला लागले असून धनशक्ती विरुद्ध आमचा लढा असल्याची माहिती काँग्रेस नेत्या प्रतिभा शिंदे यांनी डॉ शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानन्तर अमळनेर येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मराठा मंगल कार्यालयात पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी उमेदवार डॉ. अनिल शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, माझ्या कामाची पद्धत सर्वांनी पाहिली असुन ,सर्व संस्थांमधून मी काम करत आलो आहे.या निवडणुकीत “साधा माणूस आपला माणूस” हेच माझे ब्रीदवाक्य असून हात दाखवा गाडी थांबवा हीच माझ्या कामाची पद्धत आहे.मी निवडून आल्यास अमळनेरचे बारामती नाही पण शिरपूर नक्की करेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच उमेदवारी मिळण्यास उशीर झाला तरी मी मैदानात आधीपासूनच होतो, माझी एक प्रचार फेरी पुर्ण झाली आहे,आम्ही सर्व एकसंघ झालो असून आज रॅलीत सर्व दिसले याचे समाधान आहे.माजी आमदार कृषिभूषण साहेबराव आज नसले तरी त्यांनी गजानन महाराज यांची शपथ घेऊन सांगितले की मी सोबत आहे असे त्यांनी आवर्जून सांगत अमळनेर येथे सभा मागितल्या असून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, शरदचंद्र पवार किंवा खासदार अमोल कोल्हे यांच्या सभा होऊ शकतात असे प्रतिभा शिंदे यांनी सांगितले.