उद्या भरणार उमेदवारी अर्ज
अमळनेर :-
अमळनेर विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने ओबीसी चेहरा म्हणून दै. पुण्य प्रताप चे मुख्य संपादक विवेकानंद वसंतराव पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
अमळनेर तालुक्यात शिक्षण संस्थेच्या माध्यमातून, बहुजनवादी विचारांचे कै. व.ता.पाटील यांचे सुपुत्र दैनिक पुण्यप्रताप चे मुख्य संपादक विवेकानंद वसंतराव पाटील यांच्या कार्याची दखल घेत बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना अमळनेर विधानसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर केली.
उद्या ता.२९ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

