डॉ योगेश महाजन यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिवाळीचा फराळसह भेटवस्तू वाटप
पारोळा (प्रतिनिधी )—-
चामुंडा माता बहुउद्देशीय विकास परिसर धुळे संचलित परिश्रम मतिमंद दिव्यांग मुला-मुलींच्या निवासी शाळेत ता.26 रोजी पालक मेळावा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला पालक सभेचे अध्यक्ष श्री. संजय पाटील, श्री. हेमंत माळी, सौ. किरनकौर शिकलकर, सौ. सुवर्णा संदिप चौधरी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन, कु. मंजुश्री योगेश महाजन, कु. आंचल योगेश महाजन, शाळेचे मुख्याध्यापक मनिष किसन जाधव उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित पालक सभेचे अध्यक्ष आणि पालक प्रतिनिधींना डॉ. योगेश महाजन सर, मंजुश्री महाजन, आंचल महाजन यांच्याहस्ते करण्यात करण्यात आला. पालकांना मार्गदर्शन, दिशा अभ्यासक्रम, आणि संबंधित माहिती हेमंत महाजन सर व जगदीश सोनवणे सर यांनी दिली.
दिपावलीच्या निमित्ताने, संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश महाजन यांनी सर्व विशेष विद्यार्थ्यांना फराळ, मिठाई, फटाके, व भेटवस्तू देण्यात आल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमोर त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन, नृत्य, आणि गीत गायन सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगदीश सोनवणे सर ,तर आभार प्रदर्शन हेमंत महाजन सर यांनी केले.
यावेळी या विध्यार्थ्यांमध्ये अंतर्मुख करणाऱ्या अनुभवांचा आदानप्रदान झाले. विद्यार्थ्यांच्या यशासाठी सर्व सहभागी व्यक्तींनी एकत्र येत सकारात्मक व सहकार्य भावना प्रकट केली. या स्तुत्य उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.

