अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर कार्यवाही
अमळनेर — बोरी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरु आहे. आठवड्यात शनिवारी व रविवारी मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक केली जाते.आज ता.25 ऑकटोबर रोजी दुपारी अमळनेर येथील कन्हेरे फाफोरे बु. पुलावर एक टेम्पो अवैध वाळू वाहतुक करीत असताना आढळुन आला.सदर टेम्पो अमळनेर पोलीस स्टेशन येथे मुद्दे माला सह जमा करण्यात आला आहे.यावेळी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकावर कार्यवाहीत कन्हेरे येथील तलाठी कन्हेरे श्री. अभिमन जाधव, शहापुर येथील तलाठी श्री विक्रांत कदम यांनी या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकावर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली आहे.
सध्यस्थीतीत विधान सभा निवडणूकीचे वातावरण असल्याने तहसील कार्यालयातील कर्मचारी कामात व्यस्त असल्याने अवैध वाळू वाहतूक बोरी नदी व पांझरा नदीतून मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

