गजानन भक्तांची पायीवारी 6 नोव्हेंबरला निघणार शेगांवला
अमळनेर :- येथील दादासाहेब जी एम सोनारनगर गजानन महाराज मंदिराची पायी वारी शेगांवला यावर्षीही जाणार आहे. गेल्या बारा वर्षापासून शेगाव येथे गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी पायी वारीचे आयोजन करण्यात येते.ता. 6 नोव्हेंबर रोजी पायी वारी सकाळी 5.30 वाजता जाणार असल्याचे पायी वारी प्रमुख सेवा निवृत्त प्रा.आर. बी. पवार सर यांनी सांगितले. 6 नोव्हेंबर वार बुधवार रोजी सकाळी 5 वाजता महाआरतीने सुरुवात होऊन सकाळी 5.30 वाजता पायी वारीला सुरुवात होणार आहे. यात ता. 6 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर असे सहा दिवसांचा प्रवास असल्याने या प्रवासात सकाळी चहा, नास्ता, दुपारी जेवण,चहा,रात्रीचे जेवण प्रवासात मुक्कामाची व्यवस्था केली असल्याचे पायी वारी प्रमुख व गजानन महाराज मंदिराचे प्रमुख प्रा. आर. बी पवार सर यांनी सांगितले.
ज्या भक्तांना या पायी वारीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी प्रा. आर. बी. पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. याप्रसंगी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था गजानन ग्रुप करणखेडा,तर साई सेवा हॉस्पिटल चे डॉ. प्रशांत शिंदे भक्ताना औषधी पुरवठा मेडिकल असोसिएशन यांच्याकडून केला जाणार आहे.खेडी येथील नीलेश पाटील यांच्याकडून पायी वारीत ट्रॅक्टर सेवा दिली जाणार आहे. ज्या भक्तांना या पायी वारीत जाण्यासाठी श्री पवार सर यांना संपर्क करावा असेही सांगितले आहे

