पाडळसरेत संगीतमय “श्रीमद भागवत” कथेला सुरुवात —-
अमळनेर —
नविन पुनर्वसीत पाडळसरे ता. अमळनेर येथील गावात पंचायत समितीचे माजी सदस्य कै.दत्तात्रेय दोधू पाटील यांच्या स्मरणार्थ संगीतमय ” श्रीमद भागवत ” कथेला ता.21 पासून सुरुवात करण्यात आली. विकास सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र पाटील, माजी सरपंच रमेश पाटील व अमळनेर पाणी पुरवठा विभागाचे उपकार्यकारी अभियंता दिलीप पाटील यांनी संगीतमय भागवत कथेचे आयोजन केले आहे.
हनुमान मंदिरात श्रीमद भागवत ग्रंथ डोक्यावर घेऊन राहुल पाटील व जुगल पाटील यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व पूजन करून श्रीमद भागवत कथेसाठी गोपाल कृष्ण, विठ्ठल रुक्मिणी व संत तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज यांचे प्रतिमेची प्रतिष्ठापना करून मांडणी केली श्रीमद भागवताची आरती व तापी मैया व प्राणेश्र्वर द्वादश ज्योतिर्लिंग आरती करण्यात आली. दैनंदिन कार्यक्रम खालील प्रमाणे होत आहेत,त्यात सकाळी 5:30 वाजता काकडा आरती तर दुपारी 10 ते 2 कथा पारायण व व 6:15 ते 6:40 भागवत आरती होईल सायंकाळी 7 सांज आरती करण्यात येत असून रात्री 7 ते 10 यावेळी श्रीमंद भागवत कथेचे निरूपण
हिंदू धर्म संस्कृती रक्षक संघांचे सस्थापक श्रीमद भागवताचार्य हभप हेमंत पाठक महाराज सरवाळेकर जिल्हा नंदुरबार हे कथेचे निरूपण करत असून काल ता 22 रोजी कथा महात्म्य व गोकर्ण आख्यान सांगण्यात आले. तर आज दिनांक 23 रोजी मनू चरित्र व धृव चरित्र कथन झाले . दिनांक 24 रोजी भरत चरित्र, सती चरित्र व प्रल्हाद आख्यान सांगण्यात यईल . दिनांक 25 रोजी गजेंद्र मोक्ष, समुद्र मंथन वामन अवतार यावर विमोचन सांगण्यात येईल. दिनांक 26 रोजी श्रीराम व श्रीकृष्ण चरित्रावर प्रवचन तर दिनांक रोजी श्रीकृष्ण जन्मोत्सव, बाललीला, गोपाल काला व कंस वध यावर कथा निरूपण करत ता.26 रोजी उद्धव चरित्र, रुक्मिणी स्वयंवर आदींवर कथा वाचून दुपारी 4 वाजता श्रीमद भागवत ग्रथासह, गीता ग्रंथ व मुर्त्यांचा पालखी सोहळा पुर्ण गावात साजरा होईल व ता.27 रोजी व्यास पुजन, होम हवन, पुर्णाहुती होऊन सकाळी 12 पासुन महाप्रसाद वाटप करण्यात येवून श्रीमद भागवत कथा सप्ताहाची सांगता होईल.

श्रीमद भागवत कथा सप्ताहात संगीत संयोजक म्हणून हभप भगवान केवट व हभप संदीप पाटीदार महाराज हार्मोनियम साथ देतील तर हभप राकेश सोळंकी महाराज तबला वादन व हभप निलेश महाराज गायनाला साथ देत आहेत.
