पोलीस पाटील संघटनेचे सर्वत्र कौतुक
अमळनेर:-
दापोरी खु. ता. अमळनेर येथील पोलीस पाटील सुधाकर कोळी यांचे मागील दोन महिन्यापूर्वी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले होते.
सुधाकर कोळी यांच्या कुटुंबियांना पोलीस पाटील संघाचे पदाधिकारी व मित्र परिवार यांनी वर्गणीतून पैसा गोळा करीत त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करीत सहकार्य केले.याप्रसंगी त्यांच्या घरी जात जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे,जिल्हा सचिव लखीचंद पाटील,धरणगांव तालुकाध्यक्ष किशोर भदाणे, अंकुश पाटील,महेश पाटील, गणेश भामरे ,महेंद्र पाटील,प्रदीप चव्हाण, भरत निकुंभ,रुंधाटी येथील सहकारी,यांनी सांत्वनपर भेट देत आर्थिक मदत सुपूर्त केली. अमळनेर तालूक्यातील पोलीस पाटीलांसह जिल्ह्यातील बांधवांनी त्यांना आर्थिक मदत दिली होती ती मदत केली. मागील थकीत तीन महिन्याचे 45 हजार रुपये मानधन त्यांना काढून देत त्यांच्या परिवाराला सर्व प्रकारचे सहकार्य कायम करत राहू असेही सांगितले.

