
अंमळनेर शहरातील प्रभाग क्रमांक ७ मधून जाणारा आणि अनेक गावांना जोडणारा *मुख्य ढेकू-मांडळ रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता.* या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे स्थानिक नागरिकांना दैनंदिन प्रवासात मोठा त्रास सहन करावा लागत होता. *वारंवार होणाऱ्या या त्रासाला कंटाळून नागरिकांनी लोकप्रतिनिधी राजूदादा फाफोरेकर व योगिता ताई कापडणेकर यांच्याकडे रस्ता दुरुस्तीसाठी आग्रही मागणी केली होती.* नागरिकांच्या या रास्त मागणीची दखल घेत, लोकप्रिय आमदार अनिल दादा पाटील यांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहून रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी आमदारांनी ठेकेदाराकडून कामाच्या गुणवत्तेबाबत पूर्ण खात्री करून घेतली असून, हे काम अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे व्हावे अशा कडक सूचनाही दिल्या आहेत.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या या मुख्य रस्त्याच्या कामाला अखेर गती मिळाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या *पाहणी दौऱ्यावेळी आमदार अनिल दादा पाटील यांच्यासोबत जितेंद्र मनीलाल पवार, निलेश फाफोरेकर, अशोक पाटील, सोनवणे सर, मनीष भावसार, सरपंच सुनील पवार, नितीन पाटील यांच्यासह भागातील अनेक स्थानिक नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.* लोकप्रतिनिधींच्या या तत्परतेमुळे प्रलंबित प्रश्नावर अखेर तोडगा निघाल्याची भावना सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.
