

अमळनेर येथील मंगळग्रह येथे दि. १९ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय भूमी सुपोषण शुभारंभाचा कार्यक्रमाच्या नियोजन बाबत
जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल जी. करणवाल यांची उपस्थिती होती. यानंतर त्यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना अमळनेर अंतर्गत टाकरखेडा, दहिवद अंगणवाडी केंद्राना भेटी दिल्या. याप्रसंगी मिनल करणवाल यांनी अंगणवाडीतील चिमुकल्याशी संवाद साधला तसेच अंगणवाडीत चिमुकल्याना दिल्या जाणारा पूरक पोषण आहाराचा देखील आस्वाद घेतला.दहिवद, टाकरखेडा येथील कामकाजाबाबत माहिती घेत समाधान व्यक्त केले. यावेळी गटविकास अधिकारी एन. आर. पाटील, अंगणवाडी पर्वयेक्षिका श्रीमती. अलका पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.
