

महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. 18 फेब्रुवारी 2025 च्या शासन निर्णयानुसार, गतिमान प्रशासन व आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण योजनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर दिनांक 14 मार्च रोजी गडखांब, मंडळ – नगाव ता अमळनेर येथे संपन्न झाले.
या शिबीराचे उद्घाटन मा. श्री. रुपेशकुमार सुराणा तहसीलदार अमळनेर यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी,स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध तालुका स्तरीय शासकीय अधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
◾ शिबीरामध्ये दिले गेलेले ठळक लाभ :
▪️ पुरवठा शाखा – 137 नवीन/दुबार शिधापत्रिका
▪️ संगायो शाखा – 99 लाभार्थ्यांची DBT प्रक्रिया पूर्ण, 235, हयात प्रमाणपत्रे, 42 नवीन अर्ज
▪️७/१२ दुरुस्ती – 31
▪️ फेरफार नोंदी – 22
▪️७/१२ वाटप – 720
▪️ उताऱ्यांची संख्या -410
▪️ सेतु शाखा – 318 उत्पन्न, 135 रहिवासी, 49 जातीचे दाखले वाटप, 13 – नॉन क्रिमिलीअर
शिबिराच्या ठिकाणी विविध प्रशासकीय विभागांचे माहितीपर प्रदर्शनीय टेबल लावण्यात आलेले होते.
➡️ एकूण 800–850 नागरिकांची उपस्थिती नोंदवली गेली.
शासकीय सेवा थेट गावपातळीवर पोहोचवण्यात आली.
मा. श्री. रुपेशकुमार सुराणा तहसिलदार अमळनेर यांनी प्रस्तावना मांडली श्री.सी यु पाटील निवासी नायब तहसिलदार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
