
कळमसरे ता. अमळनेर —
8 मार्च “महिला दिन” त्यानिमित्ताने आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडून शासकीय सेवेमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या तसेच आयुष्यात दुहेरी भूमिका अतिशय प्रामाणिकपणे व यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महिला कर्मचारी बहिणींचा सामर्थ्य प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला व भेटवस्तू देण्यात आली.
यावेळी आपल्या सामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असतात त्या पोलीस दलातील अमळनेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक कविता ठाणगे , महिला पोलीस नम्रता जरे मॅडम,मोनिका पाटील मॅडम यांचा, ग्रामीण व शहरी भागातील रुग्णांच्या वेदनांवर मायेची फुंकर घालणाऱ्या व आरोग्य सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या आरोग्य विभाग अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील नर्सिंग अधिकारी अर्चना चंद्रकांत ढाले मॅडम यांचा सन्मान सामर्थ्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल दिनेश माळी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
