
अमळनेर येथील म.रा.वि.वि.कंपनी अमळनेर उपविभाग १ अंतर्गत अमळनेर शहर व परिसरा मधील घरगुती, व्यवसायिक व
औद्योगिक वीज ग्राहकांच्या मीटरची तसेच वायरिंगची तपासणी महावितरण चे अधिकारी व कर्मचारी यांनी सुरु
केलेली असून गेल्या महिन्याभरात सुमारे ७० वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक व कायदेशीर कार्यवाही
करण्यात आलेली आहे. त्यामध्ये घरगुती – ६५, व्यवसायिक – ०५ असे एकूण- ७० वीज चोर ग्राहकांनी सुमारे ५७७००
युनटची वीज चोरी केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. त्यात
मुखत्वे गलवाडे रोड वरील व्यवसायिक ग्राहकांचा देखील समावेश आहे.
तसेच महावितरण तर्फे यापुढेही वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांवर कार्यवाही चालू राहणार आहे. तरी
अधिकृतपणे वीज कनेक्शन घेऊनच वीज वापर करावा असे आव्हान महावितरण तर्फे करण्यात येत आहे.
सदर धडक मोहिमे करिता कार्यकारी अभियंता धरणगाव विभाग श्री. निलेश सोनगिरे साहेब यांच्या मार्गदर्शना
खाली अमळनेर उपविभाग – १ चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. टी. एच. नेमाडे साहेब यांनी अधिकारी व
कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून वीजचोरी शोध मोहीम राबविण्यात आली. कारवाई करण्यात हि वरिष्ठ अधिकारी यांनी हि माहिती दिली आहे
