
ग्रामपंचायत कळमसरे कडुन जि.प.प्राथ.मुलांची शाळा कळमसरे ला सीसीटीव्ही कॅमेरे व प्रिंटर भेट
अमळनेर प्रतिनिधी-जि.प. प्राथमिक मुलांची शाळा कळमसरे ता.अमळनेर येथे सीसीटीव्ही कॅमेरा व प्रिंटर शाळेस अर्पण सोहळा पार पडला.
ग्रामपंचायत कळमसरे कडुन शाळेस चार सीसीटीव्ही कॅमेरे एलसीडी मॉनिटर व मोठे प्रिंटर भेट देण्यात आले.या कार्यक्रमाप्रसंगी सरपंच जगदीश निकम उपसरपंच जितेंद्रसिंग राजपूत ग्रा.प सदस्य दिनकर चव्हाण,ग्रा.प. सदस्या मीनाबाई कुंभार , विस्तार अधिकारी कठाडे साहेब ,ग्रामविकास अधिकारी श्री ज्ञानेश्वर पाटील, ग्रामपंचायत अधिकारी वाघ भाऊसाहेब शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास भिल, उपाध्यक्ष वसंत महाजन, कन्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप महाजन, पत्रकार श्री बाबूलाल पाटील व श्री गजानन पाटील ,व्यवस्थापन समिती सदस्य सौ. शितल भिल ,सौ.पौर्णिमा वल्लर सौ.सोनाली पारधी आदी उपस्थित होते.मुख्याध्यापक श्री .किशोर सिसोदे यांनी प्रास्ताविक केले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री.रावसाहेब मांगो पाटील व केंद्रप्रमुख श्री अशोक सोनवणे यांनी ग्रामपंचायतीचे आभार व्यक्त केले. याप्रसंगी कन्या शाळेचे श्री.केशव बडगुजर सौ.जयश्री बडगुजर व पालक श्री.सुनील पाटील श्री. शांताराम पवार, श्री. कृष्णा भील उपस्थित होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. भरत जाधव यांनी केले. स्वयंपाकी सौ अर्चना कुंभार , श्री योगेंद्रसिंग पाटील यांनी सर्व सहकार्य केले.
दरम्यान कळमसरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आता cctv च्या निगराणीत आल्याने विध्यार्थी व शाळा परिसर सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरणार आहे.या उपयुक्त उपकरणे भेट मिळाल्याने शालेय शिक्षण समिती तसेच मुख्याध्यापक यांनी आभार व्यक्त केले आहेत.
