कपिलेश्वर मंदिराचे मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी हंसानंद तीर्थ महाराज यांचा दिनांक १२ फेब्रु २०२६ गुरुवार २९ वा संन्यास वर्धापन दिन कपिलेश्वर मंदिरावर मोठ्या उत्साहात ओंकारेश्वर . त्र्यंबकेश्वर . उजैन . सह प्रमुख संन्याशांच्या उपस्थित पार पडला . हंसानंद महाराजांचा २९ वर्षाच्या संन्यस्त जीवनाचा आढावा घेवून गौरव करण्यात आला . महाराजांनी त्याच्या आता पर्यंतच्या शेकडो भाविकांना व्यसन मुक्त केले . रामनामाचा छंद लावला . पाठशाला चालवून शेकडो विद्यार्थ्यांना घडवले . आता पर्यंत १० प्राचिण मंदिरांचा जीर्णोद्धार केला . २९ वर्ष प्रवासाचे अनुभव कथन केले . रामानंद तीर्थ महाराज . देवेश्वर तीर्थ स्वामी यांनी महाराजांच्या सानिध्यात खुप काही ज्ञान प्राप्तीचा अनुभव सांगीतला . प्रसंगी जेष्ट विश्वस्त घनश्याम अग्रवाल अमळनेर . विश्वस्त श्री मंगल तात्या . पानाचंद पाटील . लादु भिवसन चौधरी . सुदाम पाटील . तुकाराम चौधरी . नामदेव कोळी . व पंच क्रोशि चे शेकडो भाविक उपास्थित होते . ट्रस्टचे सचिव मगन भाऊसाहेब यांनी सुत्र संचलन केले . उपाध्यक्ष श्री सी एस पाटील . यांनी आभार मानले . भंडारा प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली
