
संगीत अलंकार परीक्षेत सौ. मनाली उपासनी प्रथम
शिरपूर येथील मोहिनीराज संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ मनाली सुघोष उपासनी यांनी नुकत्याच झालेल्या नोव्हे २०२५ सत्रात अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ, मुंबई तर्फे घेण्यात येणाऱ्या संगीत अलंकार ह्या परीक्षेत अथर्व संगीत विद्यालय, नाशिक येथून प्रथम श्रेणीसह केंद्रात प्रथम येऊन दैदिप्यमान यश मिळवले. यासाठी त्यांना गुरू म्हणून अमळनेर येथील संगीत अलंकार सौ. मोहिनी खाडिलकर व पुणे येथील ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका संगीताचार्य डॉ. नीता भाभे यांचे उत्तम व सखोल मार्गदर्शन लाभले. तसेच धुळे येथील संगीत अलंकार सौ. भावना कुळकर्णी, संगीत विशारद डॉ. प्रा. श्री. प्रदीप कुळकर्णी व जळगाव येथील संगीत अलंकार श्री. दुष्यंत जोशी यांचे देखील मार्गदर्शनपर सहकार्य मिळाले. त्या दोंडाईचा येथील नूतन माध्यमिक विद्यालयाच्या संस्कृत शिक्षिका सौ. संजीवनी मुळे व मेथी ता. शिंदखेडा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री. शामकांत मुळे दोंडाईचा ह्यांच्या कन्या व शिरपूर येथील आर सी पटेल फार्मसी महाविद्यालयाचे प्रा. सुघोष उपासनी ह्यांच्या पत्नी आहेत. त्यांना त्यांचे भाऊ श्री. वैभव मुळे (Civil Engineer, Mumbai), भावजय सौ. प्रियंका मुळे व मुलगी कु. ऋचा उपासनी ह्यांची देखील साथ मिळाली. ह्या मिळालेल्या यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
