
महाराष्ट्राचा दादा आणि बाप माणूस आज हरवला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दादा हक्काचे माननीय अजित दादा पवार साहेब दुर्दैवी निधनाची बातमी अतिशय क्लेशदायक आहे अजूनही विश्वास बसत नाही. अजित दादा आपल्यात नाही संपूर्ण महाराष्ट्राने अतिशय उत्तम प्रशासक ,शिस्तशील नेतृत्व जनतेसाठी भले पहाटे काम करणारा हक्काचा माणूस गमावला.
दादा तुमचे असे अकाली जाणे सर्वसामान्य जनतेला बिलकुल ही रुचलेलं नाही.आज फक्त बारामतीकरांना नव्हे राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात अश्रू आणि पोरकेपणाची भावना आहे.
ज्या माणसाने आयुष्याचा प्रत्यक्ष क्षण महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि फाइल्सच्या निपटारा करण्यासाठी वेचला तो आवाज आज कुठेतरी शांत झालाय. यावर विश्वासच बसत नाही. दादांचा स्वभाव अनेकांना कडक वाटला असेल. कडक स्वभावा मागे राज्याची हिताची कळकळ आणि कार्यकर्त्यांच्या बद्दल जिव्हाळा होता. राजकारणात शब्द बदलणारे बरेच जण पाहिले. पण दादांनी शब्द दिला म्हणजे काम होणारच जनतेचा विश्वास कायमचा स्मृती बनलाय. मंत्रालयाच्या रिकाम्या दालनात देखील मा. अजितदादा पवार कार्यशील, कर्तुत्व,नेतृत्वाची कायम उणी भासेल दादा तुमचं नाव कायम हृदयात कोरलेला असेल.
*भावपूर्ण श्रद्धांजली दादा* 💐💐
