कळमसरे येथील नवसाचा गणपती मंदिराला मधुकर माळी यांनी केले स्वखर्चाने
कळमसरे ता. अमळनेर येथील नीम कपिलेश्वर रस्त्यावरील नवसाला पावणारा गणपती मंदिराला येथील सोसायटीचे माजी चेअरमन मधुकर यशवंत माळी यांनी स्वखर्चाने रंगकाम केले.
गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी मंदिराचे बांधकाम होऊन गणपती मूर्ती व महादेवाची पिंड स्थापना करण्यात आली होती. त्यावेळी मंदिराचे ट्रस्ट्री अध्यक्ष हरिष मराठे व ट्रस्ट्री यांनी लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम केले होते. पंचवीस वर्षांनी मंदिराला रंगकाम व्हावे यासाठी हरिष मराठे यांनी आवाहन केले होते. मधुकर यशवंत माळी यांनी गणपती मंदिराला पन्नास हजार रुपयांचा स्वखर्च करून रंगकाम करून दिल्याने गणपती मंदिराची शोभा वाढवली आहे.त्या निमित्ताने गणपती मंदिराचे ट्रस्टी अध्यक्ष श्री हरीश परशुराम मराठे यांनी त्यांचा सत्कार केला.यावेळी सोसायटी चेअरमन सुनील राजपूत, देविदास माळी हे उपस्थित होते.

