श्री.मनोहर महाजन यांना,”राज्य स्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार”
अमळनेर :- येथील लोकमान्य विद्यालयाचे कलाशिक्षक (मुख्याध्यापक) क्षत्रिय काच माळी समाज अमळनेर चे अध्यक्ष, विद्यार्थी प्रिय कला शिक्षक श्री.मनोहर भगवान महाजन सर यांना कलाक्षेत्रातील, सामाजिक, शैक्षणिक कार्याबद्दल अखिल महाराष्ट्र राज्य शैक्षणिक कलाशिक्षक संघा कडून दि.९फेब्रुवारी रोजी पंढरपूर जि.सोलापुर येथे झालेल्या “राज्य स्तरीय अधिवेशन (कलाशिक्षण परिषद) येथे”राज्यस्तरीय आदर्श कलाशिक्षक पुरस्कार २०२५”मा.श्री.दतात्रय सावंत(मा.शिक्षक आमदार) यांच्या हस्ते मा.श्री.शेरशाह डोंगरी, सोलापूर,मा.श्री.शालिग्राम भिरुड जळगाव,व महाराष्ट्रातील कलाशिक्षकांच्या उपस्थितित समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.राज्यस्तरिय पुरस्कार मिळाल्याबद्दल सरांचे ,मा.श्री.विवेकानंद भांडारकर, चिटणीस -लो.शि.मंडळ,मा.श्री.प्रा.डाॅ.प्र.ज.जोशी,मा.श्री.धर्मसिंह पाटील, लोकमान्य विद्यालय, शिक्षक, शिक्षकेतर वृंद, समाजस्तरातील अनेक मान्यवर गंगाराम महाजन,डॉ. योगेश महाजन, अनिल (आबू) महाजन, दिनेश माळी, अमोल माळी आदींनी अभिनंदन केले आहे.

