दहिवद जिल्हा परिषद मराठी केंद्र शाळेत स्नेह संमेलन
शिक्षकांनी दिला विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव
अमळनेर :- दहिवद ता. अमळनेर येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत स्नेह संमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
तालुक्यातील दहिवद येथील शाळेला लोकवर्गणीच्या माध्यमातून डिजिटल शाळा करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून येथील शैक्षणिक वातावरण इंग्रजी माध्यमाच्या शाळेला लाजवेल असे वातावरण निर्मिती ग्रामस्थांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. येथील शिक्षक यांनीही मेहनत घेत विद्यार्थी संख्या टिकवून ठेवली आहे. बगीचा, शाळेला रंगकाम, आदर्श शिक्षक कर्मचारी, उत्तम नियोजन असल्याने यावर्षी स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी विध्यार्थ्यांनी संगीताच्या तालावर बहारदार नृत्य केले. याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष नितीन हिमंत माळी, उपाध्यक्ष भागवत सुकलाल पारधी, रविकांत भबूतराव माळी यांच्यासह समितीचे सदस्य व गावातील ग्रामस्थ, महिला, आबाल वृद्ध उपस्थित होते.यासाठी मुख्याध्यापक हरिष पाटील, रत्नाकर सर,चेतन सर, चंद्रकांत सर,भागवत सर,अहिराव मॅडम, शिरसाठ मॅडम,भोई मॅडम यांनी परिश्रम घेतले.

