गावराणी जागल्याच्या पाठपुराव्याने बाजार समितीत १८ फेब्रुवारीला सर्वसाधारण सभा…
सर्व सोसायटी चेअरमन सह सरपंचांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन –
अमळनेर:-
येथील शेतकरी हितासाठी लढणाऱ्या गावराणी जागल्या सेनेच्या पाठपुराव्याने बाजार समितीत सर्व साधारण सभा घेण्यात येणार आहे.
दि महाराष्ट्र एग्रीकल्चर प्रोडूस मार्केटिंग (रेगुलेशन ) कायदा 1963 मधील नियम 27 अ च्या तरतुर्दीनव्ये बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा परिसरातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरभन व ग्राम पंचायतीच्या सरपंचांच्या उपस्थितीत एका आर्थिक वर्षात दर सहा महिण्याच्या कालावधीत बाजार समितीची आर्थिक उलाढाल व अन्य बाबींवर विचार -विनीमयासाठी घेणेबाबतची तरतूद केलेली आहे.
मात्र अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिरतीच्या चेअरमन पदाचा पदभार सुमारे १८ महिन्यांपासून अशोक पाटील यांच्या कडे आहे. चेअरमन पदावरील १८ महिन्यांच्या पदभाराच्या कालावधीत कोणतीही जनरल मीटिंग आयोजित करण्यात आल्याचे दिसून येत नाही. सदर बाब दृष्टीआड करण्यात आल्याचे गावरानी जागल्या सेनेने ता.१८ जानेवारी रोजी बाजार समितीला दिलेल्या पत्राद्वारे लक्षात आणून दिले होते मात्र १० दिवस उलटूनही याबाबत कोणतीच कारवाई होत नसल्याने गावराणी जागल्या सेनेने ता.२८ जाने. रोजी प्रथम स्मरण पत्र पुन्हा दिल्याने बाजार समितीने ता.१८ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र एग्रीकल्चर प्रोडूस मार्केटिंग (रेगुलेशन ) कायदा 1963 मधील नियम 27 अ च्या तरतुर्दीनव्ये बाजार समिती मध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे सर्व चेअरमन व ग्राम पंचायतीच्या सरपंचांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित केली आहे.
गावराणी जागल्या सेनेचे आवाहन –
तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन व सरपंचांनी शेतकरी हिताच्या निर्णयावर उहापोह करून हक्क अधिकार राखण्यासाठी अर्थात लिलावातील शेतमाल व्यापाऱ्याच्या गोडाऊनपर्यंत पोहचविणेचा वाहतूक भत्ता, प्लेट काट्यावरील तोलाईची रक्कम स्वतः भरलेली असतांना हिशोबपट्टीत पुनश्च तोलाईपोटी रक्कम कपात , F. A. Q. किंवा Non F. A. Q. मूल्यांकन न करता शेतमाल Non F. A. Q. दर्शविणे , नियमबाह्यपणे हिशोबपट्टीत वरईपोटी रक्कम कपात ,कापूस विक्रीची पक्की पावती न देणे अशा विविध प्रकारच्या अन्यायाबाबत न्याय मिळवून घेण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन गावरानी जागल्या सेना अध्यक्ष सत्यशोधक विश्वासराव पाटील रा. जानवे यांनी केले आहे.

